आनंद... मोरे.... आणि आनंद मोरे यांच्या तोंडून विचार मांडणारी एक पोस्ट #आपुला_संवाद_आपणाशी या हॅशटॅगने फेसबुकवर टाकली. मग संकेत आणि श्रीनिकेत या दोन मित्रांच्यामुळे तिची सिरीज झाली.
यातला आनंद थोडा स्वप्नाळू, सकारात्मक आणि भविष्यसन्मुख प्रवृत्तीचा आहे.
याउलट मोरे थोडा नकारात्मक, परंपरावादी आणि हट्टी प्रवृत्तीचा आहे.
तर आनंद मोरे प्रत्येक गोष्टीत तत्व शोधणारा आहे.
या तिघांचा आपापसातील संवाद अशी ती कल्पना आहे. यात या तिघांतली कोणी एक बरोबर किंवा एक चूक किंवा मध्यममार्ग कसा काढायचा? असा कुठलाही आव नाही.
या तिघांतले माझे मत कोणते? असा प्रश्न मी पण स्वतःला विचारत नाही. कारण माझे मत कित्येकदा प्रवाही असते. आणि ज्या प्रश्नांवर माझ्या मताने काही फरक पडणार नाही, त्याबद्दल ठाम मते ठेवून काय उपयोग. त्यापेक्षा त्या मुद्द्यांवर त्या वेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे माझ्यातल्या तीन प्रबळ प्रवृत्तींनी एकमेकांशी माझ्या मनात कसा संवाद साधला ते लिहून ठेवणे हा साधा हेतू त्यात आहे.
याचा अर्थ मला आनंद किंवा मोरे किंवा आनंद मोरे यापैकी कोणीतरी एक कायम बरोबर किंवा कायम चूक वाटतात असे नाही. किंवा तसे कुणाला वाटावेत अशीही माझी इच्छा नाही.
हवं तर त्याला आनंद मोरे 1... आनंद मोरे 2... आनंद मोरे 3 यांचा गोलमेज परिषदेतला संवाद म्हणता येईल.
हा केवळ प्रकटरित्या केलेला स्वसंवाद आहे. चूक की बरोबर... योग्य की अयोग्य... या भानगडींना सोडून हे संवाद वाचले तर वाचकाच्या मनातला गोंधळ कमी होईल.

No comments:
New comments are not allowed.